img


Subscribe on:

Latest Podcast

podcast1
आशाताईंच कोल्हापूरशी जुडलेलं नातं

आशा ताईंच्या 12 एप्रिलला त्यांच्या जण्याने भारतभर शोककळा पसरली. आशाताईंच बालपण कोल्हापूरात गेल. आशाताईंच कोल्हापूरशी असलेल्या भावनिक ऋणानुबंधाचा उलगडा या विडिओच्या माध्यमातून केला आहे. त्यामुळे हा विडिओ नक्की पहा. सकलमच्या वतीने आशाताईंनी शब्दफुलांनी आदरांजली! लेखन व प्रस्तुत – गायत्री स्वामी #AshaBhosale #AshaBhosaleandKolhapur #BaburaoPainter #KeshavraoBhosaleNatyagruh #KolhapurNews #UntoldKolhapur #KolhapurDiary #Sakalaam #gayatriswami

podcast1
गोकुळ चक्रव्यूहात ? कोणत्या गोष्टी ठरल्या कारणीभूत....

गोकुळ दूध संघ हा पश्चिम महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा सहकारी दूध संघ आहे. दिवसाला २० लाखाहून अधिक दूध संकलन गोकुळ दूध संघामार्फत केले जाते. त्यामुळं लाखो शेतकऱ्यांचा उपजीविकेचा आधार असलेल्या या संघावर प्रशासक येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.ज्यावेळी प्रशासकच्या हाती सत्ता जाईल, त्यानंतर गोकुळ मधील अनेक प्रश्नांना वाचा फुटण्याची शक्यताही नाकारता येत नाही. गोकुळ संघाच्या विद्यमान संचालक मंडळाची मुदत ४ मे २०२६ रोजी संपत आहे. #mahadevmahadik #gokulelection #buntypatil #prakashabitkar #hasanmushrif #sakalamnews #sakalaam #gokulmilk

ताज्या घडामोडी

15-04-2026

जगाचे लक्ष लागलेल्या इराण-अमेरिका संघर्षात आता निर्णायक वळण आले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सध्या सुरू असलेली दोन आठवड्यांची शस्त्रसंधी वाढवण्यास स्पष्ट नकार दिला असून, "पुढील दोन दिवस अत्यंत आश्चर्यकारक असतील," असे सूचक विधान केले आहे. ट्रम्प यांच्या मते, इराणकडे अण्वस्त्र असणे कधीही स्वीकारार्ह नाही आणि यासाठी राजनैतिक तोडगा किंवा लष्करी कारवाई यापैकी काहीही घडू शकते.
अमेरिकेने इराणच्या सर्व बंदरांची सागरी नाकेबंदी पूर्ण केल्याचे जाहीर केले आहे. तसेच, इराणवर दबाव वाढवण्यासाठी हजारो अतिरिक्त अमेरिकन सैनिक मध्यपूर्वेत धाडले जात आहेत.
जागतिक नाणेनिधीने (IMF) जगाच्या आर्थिक विकासाचा अंदाज घटवला असून, आपण एका अत्यंत प्रतिकूल परिस्थितीकडे झुकत असल्याचा इशारा दिला आहे. इंधन पुरवठ्यातील अडथळ्यांमुळे दक्षिण-पूर्व आशियाई देशांत (ASEAN) तेल संकट गडद झाले आहे. दरम्यान, इस्रायल आणि लेबनॉन यांच्यात दशकांनंतर अमेरिकेत थेट चर्चा सुरू होणार असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.
ट्रम्प यांची विधाने ही Psychological Warfareचा भाग वाटत आहेत. एकीकडे लष्करी नाकेबंदी आणि अतिरिक्त सैन्य तैनात करून इराणची कोंडी करायची आणि दुसरीकडे "करार करणे उत्तम" असे म्हणत इराणला चर्चेच्या टेबलावर झुकवायचे, ही ट्रम्प यांची रणनीती आहे. मात्र, आयएमएफ (IMF) आणि आयईए (IEA) यांनी व्यक्त केलेली चिंता पाहता, हे युद्ध लांबल्यास जागतिक अर्थव्यवस्था कोलमडण्याची भीती नाकारता येत नाही.

नितीश कुमारांच्या दोन दशकांच्या सत्तेला पूर्णविराम; भाजपचे सम्राट चौधरी बिहारचे नवीन मुख्यमंत

15-04-2026

बिहारच्या राजकारणात आज एका मोठ्या युगाचा अंत झाला आहे. जेडीयूचे सर्वेसर्वा नितीश कुमार यांनी राज्यसभेवर नियुक्ती झाल्यामुळे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला असून, त्यांच्या जागी भाजपचे सम्राट चौधरी यांनी आज बिहारचे नवीन मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. बिहारच्या इतिहासात पहिल्यांदाच भारतीय जनता पक्षाचा नेता मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर विराजमान झाला आहे.
दिग्गज नेते शकुनी चौधरी यांचे पुत्र असलेले ५७ वर्षीय सम्राट चौधरी हे बिहारमधील 'कोइरी-कुशवाह' समाजाचे असून भाजपचे OBC चे मोठे चेहरे मानले जतायेत. २०१७ मध्ये भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांचा आलेख झपाट्याने वाढला. विशेष म्हणजे, नितीश कुमारांना सत्तेतून खाली खेचल्याशिवाय 'डोक्यावर पगडी घालणार नाही', अशी प्रतिज्ञा त्यांनी केली होती, पण नंतर नितीश कुमारांच्या आघाडी सोबतच भाजप सत्तेत आले. तरी त्यांची प्रतिज्ञा पूर्ण झाली अशी जनभावना आहे. यापूर्वी त्यांनी राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली असून २०२३ मध्ये ते बिहार भाजपचे प्रदेशाध्यक्ष होते.
बिहारमध्ये गेल्या दोन दशकांपासून नितीश कुमारांच्या अवतीभवती फिरणारे राजकारण आता 'थेट भाजप'च्या हाती जाण्याची शक्यता दाटली आहे. नितीश कुमारांचे राज्यसभेत जाणे आणि भाजपने आपला मुख्यमंत्री करणे, ही आगामी २०२९ च्या निवडणुकांसाठीची मोठी रणनीती मानली जात आहे. मात्र, जेडीयूचे समर्थक या बदलाला कसे स्वीकारतात, यावर नवीन सरकारचे भविष्य अवलंबून असेल.

15-04-2026

महाराष्ट्र राजकारणात सध्या एका संभाव्य मोठ्या बदलाची चर्चा रंगली आहे. युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्याकडे ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या कार्याध्यक्षपदाची धुरा सोपवली जाण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. २००३ मध्ये ज्याप्रमाणे उद्धव ठाकरे यांच्याकडे कार्याध्यक्षपद दिले होते, त्याच धर्तीवर १९ जून रोजी पक्षाच्या वर्धापनदिनी आदित्य यांच्या नावावर शिक्कामोर्तब होऊ शकते, असे सूत्रांकडून समजते.
खासदार संजय राऊत यांनी या चर्चेचे स्वागत करताना म्हटले की, "पुढचे राजकारण तरुणांच्या हातात जायला हवे. मुंबई महापालिका निवडणुकीत आदित्य यांच्या टीमने उत्तम काम केले आहे." या बातमीवर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी टीकास्त्र सोडले. "आदित्य ठाकरेंचे नाव समोर येणे म्हणजे उद्धव ठाकरेंनी निवृत्त होण्याचे संकेत दिले आहेत," असा टोला त्यांनी लगावला. दरम्यान, खुद्द आदित्य ठाकरे यांनी 'X' (ट्विटर) वर पोस्ट करत या बातम्यांचे खंडन केले आहे. "पक्षात अशी कोणतीही चर्चा सुरू नाही, या बातम्यांमध्ये तथ्य नाही," असे त्यांनी स्पष्ट केले.

गोकुळच्या कारभाराच्या चौकशीसह प्रशासक नियुक्तीची मागणी; मुख्यमंत्र्यांशी खलबते!

15-04-2026

कोल्हापूर जिल्ह्याची आर्थिक वाहिनी असलेल्या 'गोकुळ' दूध संघाच्या कारभारावरून आता राजकीय रणधुमाळी उडाली आहे. संघाच्या कारभाराची सखोल चौकशी करून तातडीने प्रशासक नियुक्त करावा, या मागणीसाठी आमदार शिवाजीराव पाटील आणि महादेव दूध संस्थेचे संचालक प्रकाश बेलवाडे यांनी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीमुळे गोकुळच्या सत्ताधारी गोटात खळबळ माजली आहे.
आमदार पाटील आणि बेलवाडे यांनी केवळ मुख्यमंत्र्यांचीच नव्हे, तर भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांचीही भेट घेतली. पुणे येथील दूध पॅकिंग प्रकल्प खरेदीसह इतर मालमत्तांच्या व्यवहारात गैरव्यवहार झाल्याचा संशय व्यक्त करत, या प्रकरणाची 'ईडी'मार्फत (ED) चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, संचालकांसह त्यांचे स्वीय सहायक आणि वाहनचालक यांच्याही मालमत्तांची चौकशी करण्याबाबत या बैठकीत चर्चा झाल्याचे समजते.
गोकुळच्या विद्यमान संचालक मंडळाची मुदत ४ मेला संपत आली असतानाच प्रशासक नियुक्तीच्या हालचालींना वेग आला आहे. आणि ४ मे पर्यंत निवडणूका होणे अशक्य आहे. त्यामुळे गोकुळच्या कारभारावर प्रशासक येण्यार हीच शक्यता आहे. एकंदरीतच आ.शिवाजीराव पाटील आणि महादेव दूध संस्थेचे संचालक प्रकाश बेलवाडे यांच्या मागणीमुळे येणाऱ्या काळात गोकुळमधील राजकारण अधिक तापणार, हे निश्चित!

15-04-2026

आखातातील युद्धजन्य परिस्थिती आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे भारतीय बाजारपेठेत इंधन दरवाढीचा मोठा स्फोट होण्याची शक्यता आहे. विदेशी ब्रोकरेज फर्म 'मॅक्रायरी'च्या अहवालानुसार, तेल कंपन्यांना सध्या पेट्रोलवर प्रति लिटर १८ रुपये आणि डिझेलवर ३५ रुपयांचे नुकसान सोसावे लागत आहे.
चार राज्यांतील व एका केंद्रशासित प्रदेशाच्या निवडणुका संपताच ही दरवाढ ग्राहकांच्या माथी मारली जाण्याची चिन्हे आहेत. गेल्या ४६ दिवसांत कच्चे तेल ७३ डॉलरवरून थेट १०० डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले आहे. मध्य पूर्वेतील तणावाचा हा थेट परिणाम आहे. उत्पादन शुल्कात कपात करूनही तेल कंपन्यांना दररोज सुमारे १,६०० कोटी रुपयांचा फटका बसत आहे. तेलाच्या प्रत्येक १० डॉलरच्या दरवाढीमुळे कंपन्यांचे नुकसान लिटरमागे ६ रुपयांनी वाढत आहे. भारत आपल्या गरजेच्या ८८% तेल आयात करतो. वाढत्या किमतींमुळे देशाची चालू खात्यातील तूट २० अब्ज डॉलर्सपर्यंत जाण्याची भीती व्यक्त होत आहे. यामुळे चार राज्यांतील व एका केंद्रशासित प्रदेशाच्या निवडणुका झाल्यानंतर इंधन दरवाढ होण्याची शक्यता आहे. सरकारने योग्य ती पावले न उचल्यास महागाईचा भडका उडून, सामान्यांच्या खिशाला कात्री लागण्याची दाट शक्यता तज्ञांनी वर्तवली आहे.


अजून पहा
img
कामात आहात? प्रवासात आहात?

आमचे पॉडकास्ट ऑडिओ स्वरुपात ऐका...

आमच्या Spotify channel ला सबस्क्राईब करा किंवा थेट क्लिक करून ऐका

आमचे नवीन पॉडकास्टस पाहा

आमचे सर्व पॉडकास्टस

असंख्य घटनाच्या कल्लोळातून आपल्या जगण्यावर परिणाम घडवणाऱ्या घटना घडामोडींची चिकित्सा करणारं पॉडकास्ट!

एक अशी संवादमालिका जिथं पुस्तक फक्त वाचलं जात नाही तर ते अनुभवलं जात! या पॉडकास्टमध्ये आम्ही भेटणार आहोत त्या लेखकांना, अनुवादकांना, संपादित करणाऱ्यांना ज्यांची शब्दांनी विचारांना नवी दिशा दिली.

जगभरात घडणाऱ्या. लक्ष वेधून घेणाऱ्या परिणामकारक घटनांचा वेध दर आठवड्याला श्रीराम पवार यांच्या नजरेतून पाहायला विसरु नका

Enjoy New Shows

Latest episodes

img
List of Episodes

Listen Our Podcosts On Go!

Our Testimonals

Reviews from users

imng
imng
imng
img

अतुलनीय संवाद आणि प्रेरणादायक विचार! ह्या पॉडकास्ट ने मला नवीन विचार देणारे आणि जीवनावर नवा दृष्टिकोन आणले.

पर्णा देशमुख
img
img

खूपच ज्ञानवर्धक आणि प्रेरणादायक आहे. हे पॉडकास्ट नेहमीच वेगळ्या दृषटिकोनातून विचार मांडतात.

रोहन पटेल
img
img

माझ्या दैनंदिन आयुष्यात नवा उत्साह भरला आहे. ह्या पॉडकास्टच्या माध्यमातून मी खूप शिकले.

दीक्षा शर्मा
img
img
img img
David Michale Episode 13
Previous track button
Large toggle button
Next track button
00:00 / 00:00