ताज्या घडामोडी

  • Home
  • ताज्या घडामोडी

शरद पवारांचे डीजे विरोधात आवाज उठवणाऱ्या बापटांना समर्थन

04-09-2026

सध्या गणपती तोंडावर आलेले असताना, पुण्यात गणेशोत्सव दरम्यान होणारे ध्वनी प्रदूषण आणि रहदारीस अडथळा या मुद्द्यावरून डीजे वर बंदी घालण्याची मागणी करणारे विद्यानंद बापट सोशल मीडियावर आणि मेनस्ट्रीम मीडियामध्ये जोरदार चर्चेत आहेत.. यावर शरद पवार यांनी आपली भूमिका मांडली.. शरद पवार म्हणाले की सण हा सुखद आणि लोकांना आनंद देणारा असला पाहिजे, डीजेचा आवाज आणि त्यावर रस्त्यांवरील कार्यक्रम यामुळे सणाचे गांभीर्य कमी होत जाते. विद्यानंद बापट यांना मी ओळखत नाही परंतु त्यांनी उपस्थित केलेला मुद्दा योग्य. गणेशोत्सवाची परंपरा आहे मात्र उत्सवातील चुकीच्या गोष्टींवर बापट मत व्यक्त करत आहेत त्यांच्या भूमिकेला माझा समर्थन आहे. तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बापटांच्या मराठीचे कौतुक करत, आपले उत्सव पारंपारिक पद्धतीनेच साजरे केले पाहिजेत असा पुनरुच्चार केला आहे.

अजित पवार यांच्या जाण्यावरून पवार कुटुंबात मतभेद

04-09-2026

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी काही दिवसांपूर्वी अमित ठाकरेंना फोटो हटवल्याने त्यांच्यावर ताबडतोब या एफआय आर झाला, माझा भाऊ सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदावर होता, त्याचा अपघाती मृत्यू झाला आणि आजपर्यंत एफ आय आर का झाला नाही.. माझ्या भावाला न्याय कधी मिळणार असा सवाल सुप्रिया सुळे यांनी विचारला होता... यावर प्रश्न विचारला असता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या की, अजित पवार यांच्या जाण्याचं राजकारण कोणीच करू नये... माझा तपास यंत्रणांवर विश्वास आहे.. आणि त्यांच्या अपघाताच्या चौकशीची मागणी आम्ही सातत्याने करत आहोत.. ती मीडिया समोरच करावी असं काही नाही...
यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली.. त्यांनी सुरुवातीपासून हा मुद्दा लावून धरला आहे... ते म्हणाले सुप्रियाताई जे बोलल्या ते योग्यच आहे. दादाच्या एफ आय आर साठी आम्ही महाराष्ट्रात सीआयडी, मुंबई आणि बारामतीला गेलो पण एफ आय आर शेवटी कर्नाटकात करावा लागला. यामुळे सरकारला, प्रशासनाला आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या सर्व पक्षांना लाज वाटली पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील सर्वच नेते काही स्वाभिमानी नाहीत. असं म्हणत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली... आणि पुन्हा अजित दादा यांच्या मृत्यू संदर्भातील एफ आय आर साठी त्यांच्या गटातील कोणी पुढाकार घेतला नाही त्याच्यावर त्यांनी जोरदार टीका केली...
पण या सर्व टीका सत्रातून आम्ही विरोधात असलो तरी एक कुटुंबच आहोत हे सदैव भासवणाऱ्या पवार कुटुंबातील मतभेद आता चव्हाट्यावर आले आहेत...

क्षीरसागरांना मंत्री व्हायची घाई सतेज पाटलांचा टोला

04-09-2026

सध्या शक्तीपीठ महामार्गाच्या मुद्द्यावरून कोल्हापूरचे राजकारण चांगलंच तापलय. मुख्यमंत्र्यांच्या या ड्रीम प्रोजेक्टसाठी आमदार राजेश क्षीरसागर यांनी शड्डू ठोकलेला दिसतो.. नुकतच त्यांनी शेतकरी नेते राजू शेट्टी हे काय राक्षस आहेत का? सरकारने मनात आणलं तर त्यांना उलट टांगल‌ असं म्हणत त्यांच्यावर झहरी टीका केली.. तसंच उच्च व तंत्र शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनाही अंगावर घेतलं....नाव न घेता पालकमंत्र्यांचे ही रिपोर्ट कार्ड पाहिला हवं असं ते म्हणाले होते... महायुतीचे नेते चंद्रदीप नरके यांचा ही शक्तीपीठ महामार्गाला विरोध आहे, त्याबाबत त्यांचेही गैरसमज दूर करण्यात येतील असे क्षीरसागारांनी स्पष्ट केलते... यामुळे शक्तिपीठ महामार्गाच्या मुद्द्यावरून स्वपक्षीय, महायुतीतले नेते आणि विरोधक यांच्यावर जोरदार हल्लाबोल राजेश क्षीरसागर सातत्याने करत आहेत. कोल्हापूरमध्ये महायुतीची सत्ता असल्याने अडीच वर्षानंतर मंत्रिमंडळात बदल होतील आणि आपल्याला मंत्रिपद मिळाले नाही याचं वाईट वाटलेलं हे क्षीरसागर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलेलं..याच पार्श्वभूमीवर, काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी कधी एकदाचा पालकमंत्री आबिटकर यांना बाजूला काढतोय आणि मी मंत्री होतोय. राजेश क्षीरसागर यांना मंत्री होण्याची घाई लागली असा टोलाही लगावला... शक्तीपीठ हा ग्रामीण भागाचा प्रश्न आहे त्यात त्यांनी पडायला नको होते.
राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनत आहे त्यासाठी राज्याला स्वतंत्र गृहमंत्र्याची गरज आहे असेही ते म्हणाले.

अर्थव्यवस्था सुंदर आहे असं सरकारचा भासवण्याचा प्रयत्न शरद पवारांची टीका

03-09-2026

नुकतंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युद्धजन्य परिस्थिती असतानाही देशाची अर्थव्यवस्था कशी प्रगतीपथावर आहे आपला जीडीपी 7.8% आहे असं घोषित केलेलं...
यावरच पत्रकारांशी बोलताना शरद पवार म्हणाले की, प्रधानमंत्री आणि अर्थमंत्री देशात सुंदर चित्र असल्याचा भासवण्याचा प्रयत्न करत आहेत. जे मूळ दुखणं आहे त्याच्याकडे त्यांचं लक्ष नाही. अर्थव्यवस्था खाली जातंय त्याची नोंद त्यांनी घेतलेली आहे असं दिसत नाही. आज प्रधानमंत्री जय आंतरराष्ट्रीय पातळीवरून बोलतायत, पण इथली वस्तू स्थिती एकादृष्टीने वेगळी आहे. याचा तुमच्या खिशावर परिणाम होईल.
दरम्यान, माझी अर्थसचिव सुभाषचंद्र गर्ग यांनी सरकारच्या जीडीपी मोजण्याच्या पद्धतीवर आणि आकडेवारीवर आक्षेप घेत सरकारने दिलेली आकडेवारी चुकीची असल्याचे म्हटले. सध्या देशाचा खरा जीडीपी 2.6% असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

पुण्यात डीजेविरोधी आवाज उठवणारे विद्यानंद बापट यांना मारहाण; मुख्यमंत्री फडणवीस यांची प्रतिक्

03-09-2026

गणेशोत्सवातील डीजे आणि ढोल ताशांच्या प्रचंड आवाजाविरोधात आवाज उठवणारे पुण्यातील सजग नागरिक विद्यानंद बापट यांना कानशिलात लगावून मारहाण करण्यात आली. या घटनेमुळे पुण्यात खळबळ उडाली असून, मारहाण करणाऱ्या संतोष चव्हाण नावाच्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हल्ल्याचा निषेध केला आहे. "लोकशाहीत प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. मत मांडत असताना असा हल्ला करणे पूर्णपणे चुकीचे आहे," असे मुख्यमंत्री म्हणाले. तसेच, गणेशोत्सव वादात न पाडता परस्पर समन्वयाने पारंपारिक पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन त्यांनी केले.
दरम्यान, "सवंग प्रसिद्धीसाठी आणि भीती निर्माण करण्यासाठी माझ्यावर हा हल्ला करण्यात आला," असा आरोप विद्यानंद बापट यांनी केला. सार्वजनिक उत्सव साजरी करताना ध्वनीप्रदूषण होणार नाही आणि रहदारीस अडथळा होणार नाही, एवढीच आपली भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

View All the Podcast Episodes today!

Sakalaam Youtube Channel
img